PM Modi : पंतप्रधानांच्या ट्विटर अकाउंट वरून बिटकॉइन बद्दल मोठी घोषणा...



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती पहाटेच्या सुमारास समोर आली. देशात बीटक्वाईनला अधिकृत मान्यता देत असल्याची घोषणा त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आली. हा मेसेज मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड झाल्यानंतर ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे समजले. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याचे समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटवरून बिटकॉइनबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवर लक्ष्य करण्यात आले. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावरून काही ट्वीट करण्यात आले. यामध्ये बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाउंट 12 डिसेंबर रोजी सकाळी दोन वाजण्याच्या सुमारास हॅक करण्यात आले होते.

अकाउंट हॅक करण्यात आल्यानंतर करण्यात आलेले पहिले ट्वीट काही मिनिटांतच डिलीट करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा तेच ट्वीट पुन्हा करण्यात आले. हे ट्वीटदेखील हटवण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने या हॅकिंगबाबत अधिकृतपणे माहिती दिली.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटसोबत छेडछाड करण्यात आली. याबाबतची माहिती ट्वीटरला देण्यात आली आहे. आता त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित करण्यात आले आहे. हॅकरने केलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या