एटीएम फोडून 23 लाख चोरणारे चोरटे दोन दिवसात जेरबंद,

दौंड  :


यवत येथे महाराष्ट्र बँकेचे ए. टी. एम.मशीन गॅस कटरने फोडून त्यातील 23 लाख,80 हजार 700 रुपये चोरून नेणाऱ्या दोन चोराना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ,अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या जेरबंद केलेल्या दोन चोरांकडून 10 लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली एक चोरीची मोटार सायकल जप्त केली आहे.
अजय रमेशराव शेंडे वय 32 रा, सहज पूर ता, दौंड जि, पुणे आणि त्याचा साथीदार शिवाजी उतम गरड वय 25  रा, करंजी, पो,लेहनी ता, रिसोड जि, वाशिम याना जेरबंद करण्यात आले आहे.
सदर गुन्हा यवत येथे दि,17 रोजी घडला होता, घटना स्थळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ, अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,नारायण पवार पोलीस निरीक्ष कयांनी भेट देऊन पाहणी केली,सदर तपास  कामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे स,पो,नि, संदीप येळे, उप पो,नि, अमोल गोरे,  रामेश्वर घोडणगे, यवतच्या स,पो,नि, संजय नागर गोजे, यांचे नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी सर्वश्री तुषार पनंदा रे, राजू मोमीन, अजित नाईक, योगेश नागरगोजे, असिफ शेख, गुरू गायकवाड, अजय घुले, प्रमोद नवले, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, मुकुंद कदम, पूनम गुंड, अमोल शेंडगे, निलेश कदम, बाळासाहेब खडके, रामदास जगताप, मारुती बराठे, महेंद्र चांदणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
विश्वनिय  बतमीदाराकडून सदर गुन्हा हा सहजपुर येथील अजय शेंडे याने केल्याची माहिती मिळताच त्वरित हालचाल करून शेंडे यास सहजपुर येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा शिवाजी गर ड आणि अन्य दोन फरारी साथीदार यांचेसह केल्याची कबुली दिली, दोघांनाही जेरबंद करून त्याच्याकडून रोख 10 लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली चोरीची मोटार सायकल जप्त केली आहे.
सदर चोरांनी यापूर्वी कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडणे, वाशीम येथे 1लाख 84 हजार किमतीचे 12 तोळे सोने व लॅपटॉप चोरणे, गातेगाव पोलीस ठाणें हद्दीत गॅस कटर ने एटीएम फोडून 7 लाख67 हजार चोरी, तर
यवत व कुरकुंभ गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल लोणी काळभोर येथुन चोरली.
हे गुन्हे उघड झाले आहेत.
ऐ,टी, एम, फोडून 23 लाख चोरीचा दोनच दिवसात तपास लावल्याने पोलीसाचे अभिनंदन करण्यात येणार येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या