विना मास्क फिरला, 500 रुपये दंड भरला !

दोन दिवसात 110 जणांवर दंडात्मक कारवाई    

                                              

पाटस :

यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस, केडगाव व यवत या गावांमध्ये मागील दोन दिवसात विना मास्क फिरणाऱ्या 110 व्यक्तींवर पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारुन 55 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.    
                     
जानेवारी महिन्यापासून कोरोनाच्या नवा विषाणुच्या संसर्गामुळे पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यात कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. 

त्यानुसार यवत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाटस केडगाव व यवत या गावांमध्ये 6 व 7 जानेवारी रोजी यवत व पाटस पोलिसांनी विना मास्क फिरत असणाऱ्या तब्बल एकशे दहा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडुन पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारून दोन दिवसात 55 हजार रुपये दंडात्मक कारवाई  केली आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी  वावरताना आणि गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्कचा वापर करावा, शक्यतो गर्दीत जाणे टाळावे, जिल्हाधिकारी यांनी  दिलेल्या आदेशाचे व नियमांचे पालन करावे. विना मास्क व  नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची व गावाची आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या