Breaking News

600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क बदलण्यासाठी सावरिकरने पाच कोटी रुपये दिल्याचा दावा

 


पुणे-  टीईटी 2018 च्या परीक्षेत सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क बदलण्यासाठी अभिषेक सावरिकर ने पाच कोटी रुपये दिल्याचा दावा जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमारनं केलाय.

शिक्षक पात्रता परिक्षेतील गैरव्यवराहारमधील नव्या गोष्टी समोर येत आहेत. पुणे पोलिसांच्या तपासात टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाला होता.2018 च्या टीईटी परीक्षेत सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क बदलण्यासाठी पाच कोटींचा व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरिकरने पाच कोटी रुपये दिल्याचा जी ए सॉफ्टवेअर च्या अश्विनीकुमार यानं केलाय. पोलिसांच्या तपासात आश्विन कुमार यानं दिल्याची माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात माहिती दिली.

जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला 20 ते 21 डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.

Post a Comment

0 Comments