कोरोनाचे प्रतिबंधीत लसीकरण शहरात 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाले. यामध्ये सर्वप्रथम शासकीय आणि वैद्यकीय कर्मचार्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 1 फेब्रुवारी पासून फ्रंटलाईन वर्कर्सचे, 1 मार्चपासून 65 वर्षांवरील नागरिकांचे, 1 एप्रीलपासून 45 वर्षांपुढील नागरिकांचे आणि 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू झाले. तर 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर व सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक यांना तिसरा डोस देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने 18 वर्षावरील 33 लाख नागरिकांचे व 15 ते 18 वर्षावरील अडीच लाख मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. लसीकरणाच्या वर्षभराच्या या प्रवासात 36 लाख 71 हजार 879 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे पहिला डोस देण्याचे प्रशासनाचे 100 टक्के उद्दीष्ठ पूर्ण झाले आहे. तर दुसरा डोस 28 लाख 13 हजार 248 नागरिकांनी घेतल्याने दुसर्या डोसचे 85 टक्के उद्दीष्ठ पूर्ण झाले आहे. तर 15 ते 18 वर्षापर्यंतच्या 55 हजार 605 मुलांनी पहिला डोस घेतला आहे. तसेच 18 हजार 654 जणांना तिसरा बुस्टर डोस देण्यात आल्याची माहिती महिपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
------------------------------
चौकट
------------------------------
सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले ः
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शहरात कोरोना प्रतिबंधीत लसीकरण हाती घेण्यात आले. यासाठी शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व सरकारी कर्मचार्यांसह सोसायट्या, झोपडपट्ट्या, रस्त्यावर राहणारे नागरिक, अंधरूणास खिळून असलेले निराधार नागरिक, दिव्यांग, वेश्या वस्तीतील महिला, तुरुंगातील कैदी, मेंटल रुग्णालयातील रुग्ण, भेक्षेकरी अशा सर्वच घटकातील व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या प्रवासात नगरसेवक, नेते, शिपाई, अधिकारी, नागरिक या सर्वांचेच मोलाचे सहकार्य मिळाले.
- डॉ. सूर्यकांत देवकर, आरोग्य अधिकारी, महापालिका
0 Comments