महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिवपदी शीला उंबरे यांची निवड

 महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिवपदी

शीला उंबरे यांची निवड


मुंबई :


 महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला महासचिवपदी जेष्ठ नेत्या शीलाताई उंबरे (पेंढारकर) यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या मान्यतेने महाराष्ट्राच्या प्रभारी तथा राष्ट्रीय महासचिव आ ममता भूपेश यांनी नियुक्तीचे पत्र दिल्लीतून जारी केले असल्याची घोषणा महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी मुंबईतून केली आहे. 

शीलाताई यांची 1989 मध्ये पहिल्या महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
तेव्हा पासून त्या पक्षासाठी एकनिष्ठ कार्यरत आहेत. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले व ना. सतीश बंटी पाटील यांनी वयक्तिक त्याचें अभिनंदन केले आहे.

सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग 
जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी शीलाताई कायम कार्यरत असतात. तसेच महिला बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना शहरामध्ये सक्षम करण्याचे काम केले आहे. 
महिलांवरील होणाऱ्या अन्यायासाठी शीलाताई नेहमी कार्यरत असतात.


कसलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना देखील शीलाताई उंबरे पेंढारकर यांनी हे पद हस्तगत केल्या बद्दल सर्व स्थरातून त्यांचे कौतुक होत आहे.

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या