शिरसाई मंदिरातील दागिने चोरणाऱ्या पती-पत्नी सह मेव्हणीस अटक

पोलीसांनी २४ तासात लावला आरोपींचा छडा


बारामती :
लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरसाई माता मंदिरातील दागिणे चोरणाऱ्या पती पत्नी व मेव्हणीस बारामती तालुका पोलीसांनी २४ तासाच्या आत अटक करत धडाकेबाज कारवाई केली आहे. यामध्ये आतापर्यंत चोरी केलेला एकूण १२ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.

या प्रकरणी शाहरूख राजु पठाण (वय २४ वर्षे) (रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर) मुळगाव (शिव तकारवाडी, निरा ता. पुरंदर जि. पुणे), पुजा जयदेव मदनाळ (वय १९ वर्षे)  (रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर) मुळगाव (जुनाबिडी कुंभारी जि. सोलापुर), अनिता गोविंद गजाकोश (वय १९ वर्षे) (रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव (गोलघुमट शिवाजी चौक विजापुर जि. विजापुर राज्य कर्नाटक)  यांना ताब्यात घेतले आहे.

 बारामती तालुक्यात (दि:८) रोजी मध्यरात्री  शिसुफळ गावी असलेल्या शिरसाई मंदिरातील देविच्या अंगावरील दागिणे व मंदिरातील इतर वस्तु चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. सदर बाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३८०,४५७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

सदर घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधिक्षक  अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तपासाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक ढवाण व पोलीस ठाण्यातील अधिकारी, गुन्हे शोध पथकातील अमलदार, तसेच इतर पोलीस स्टाफसह घटनास्थळी जावून वेगवेगळ्या टिम मनवून शिर्सुफळ, मळद, कुरकुभ, दौंड, बारामती आसपासच्या परिसरातील जवळपास ६० ते ६५ सीसीटिव्ही कॅमे-याच्या फुटेजची पाहणी केली.
परंतू रात्रीची वेळ असल्याने आरोपीत यांनी वापरलेल्या वाहनाचा नंबर समजण्यास अनेक अडचणी येत होत्या, परंतू पोलीस पथकाने वेगवेगळ्या कुलप्त्या वापरून आरोपींनी वापरलेल्या इको वाहन क. (एम.एच १४ एफ एक्स ४५७६) चा नंबर मिळाला. त्याप्रमाणे पोलीस पथक सदर वाहनाच्या मालका पर्यंत पोहचले असता सदर इको वाहन मालकाने त्याचे वाहन (दि ४) डिसेंबर  रोजी पिंपरी येथून चोरीस गेले असून त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. 
 
त्यामुळे आरोपींचा शोध घेणे आणखी जिकरीचे झाले परंतु तपास पथकाला तांत्रिक बाबीवरून आरोपी हे गोकुळ शिरगाव ता. करविर, जि. कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने तेथे जाऊन सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. 

पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली देऊन शिरसाई माता मंदिरात चोरी सह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील वेगवेगळया जवळपास २० ते २४ मंदिरातील दागिणे व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना सदर गुन्हयात करण्यात आली असून मा.न्यायालयाने त्यांना अटक (दि:१५) रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिले आहे. यातील अटक आरोपी शाहरूख पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भोसरी पो.ठाणे. समर्थ पो. ठाणे फरासखाना पो. ठाणे येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.


सदरची कामगिरी  पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अभिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस अमलदार नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अमोल नरुटे, मंगेश कांबळे, चालक बापू गावडे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या