बलात्कारप्रकारणी पोलिसाला कोठडी

श्रीरामपूर : बलात्कार प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुळशीराम वायकर याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. वायकर याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांचाही त्यात समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या