जहाल नक्षली दुलसा नरोटे जेरबंद


image.png
गडचिरोली: १६ गुन्हे दाखल असलेल्या तसेच ज्याला पकडण्यासाठी दोन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते त्या जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे याला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आहे.
पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा हद्दीत जंगल परिसरात दि. १४ रोजी गडचिरोलीच्या विशेष अभियान पथक व सीआरपीएफ १९१ बटालियनची ई कंपनीचे जवानांनी ही कारवाई केली. 

नक्षलीदृष्टया अतिसंवेदनशिल मौजा गोरगुट्टा येथील रहिवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे (वय ३० वर्षे) पोमके गट्टा (जांबिया) ता. एटापल्ली जि. गडचिरोली हा प्लाटुन क्र.१४ च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो गट्टा दलम सदस्य व नक्षलच्या अक्शन टीमचा सदस्य होता. २००८ पासून आतापर्यंत  खुन 06, चकमक 04, दरोडा 02, जाळपोळ 03 व एक अपहरणासह जिल्हयातील वेगवेगळया हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. त्याच्यावर एकुण १६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याचेवर दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्रांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.   
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधिक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधिक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या