अर्थसंपदा पतसंस्थेची सायकल स्पर्धा उत्साहात


नारायणगाव :
 


अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव आयोजित सायकल स्पर्धेत ५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. अशी माहिती अर्थसंपदा पतसंस्थेचे संस्थापक, अध्यक्ष रमेश मेहेत्रे यांनी दिली. मेहेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने सायकल स्पर्धा नारायणगाव मध्ये पार पडल्या.

यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद झोडगे, माजी आमदार शरद सोनवणे,  ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, युवा नेते अमित बेनके, सरपंच योगेश बाबू पाटे, गणेश वाजगे, गुंजाळवाडी सरपंच रेश्मा वायकर, खोडदच्या सरपंच सविता गायकवाड, मांजरवाडीचे उपसरपंच संतोष मोरे, गुंजाळवाडीचे उपसरपंच रमेश ढवळे, नारायणगावच्या उपसरपंच पुष्पा आहेर, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ. अमेय डोके व डॉ. लहू खैरे नारायणगाव पोलीस स्टेशनचे विशेष सहकार्य मिळाले.
सूत्रसंचालन मनोज बेल्हेकर यांनी केले तर आभार हेमंत कोल्हे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या