कोट्यावधीचां निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांकडून ना. भरणेंचे आभार

इंदापूर : 



पळसदेव गावच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यमंत्री भरणेंनी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल भरणेवाडी येथे पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब काळे यांच्यासह पळसदेव येथील असंख्य पदाधिकाऱ्यांनी भरणेंचा भव्य सत्कार केला. 

 याप्रसंगी पळसदेव गावच्या उपसरपंच पदी सोनाली मेघराज कुचेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब काळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, सरपंच सुजित मोरे, नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली कुचेकर, मेघराज कुचेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच असंख्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 यावेळी भरणें बोलताना म्हणाले की, पळसदेवकरांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस ला पाठबळ देण्याचे काम केले असून या गावाचे माझ्यावर विशेष प्रेम आहे,त्यामुळे पळसदेवसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तसेच भविष्यात देखील तुम्हाला कितीही निधी लागू द्या, कसलीही मदत लागु द्या,  तुमचा हा "मामा" तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगून आपल्या सर्वांचे असेच प्रेम,आशिर्वाद व भरभक्कम पाठिंबा माझ्या पाठीशी असू द्या अशी अपेक्षाही शेवटी त्यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या