राज्यमंत्री भरणेंकडून नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड


इंदापूर : 

नगरपरिषदेच्या प्रांगणात सोमवारी (दि.१०) मुख्याधिकारी रामराजे कापरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सर्व सफाई कामगारांना रोख स्वरूपात भेट देण्यात आली.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात आनंद पहावयास मिळाला.
प्रसंगी बोलताना बाळासाहेब ढवळे म्हणाले की, ज्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे इंदापूर नगरपरिषदेचे नाव महाराष्ट्रासह देशभरात उंचावले अशा इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड व्हावी या भावनेतून ही भेट दिली. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,इंदापूर नगरपरिषदेचे विरोधीपक्ष नेते पोपट शिंदे,नगरसेविका राजश्री मखरे,नगरसेवक अमर गाडे,अनिकेत वाघ,स्वप्नील राऊत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपसरचिटणीस अनिल राऊत,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस,वसंत मालुंजकर,वसीम बागवान व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभा अधीक्षक गजानन पुंडे यांनी केले.दरम्यान नगरपरिषदेचे कर्मचारी विजय भोसले यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या