न्यायालयाच्या आवारातच आरोपीची हत्या, बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांनी झाडल्या गोळ्या

 


 लखनौ : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक अतिशय थरारक अशी घटना घडली आहे. येथे बलात्कार आणि अपहरणाचा आरोप असलेल्या तसेच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांनीच हे टोकाचे पाऊल उचलले. मुलीच्या वडिलांनी सुनावणीसाठी न्यायालयात आलेल्या आरोपीच्या डोक्यात गोळ्या झाडून त्याला संपवलंय. दिलशाद हुसैन असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचा न्यायालयाच्या आवारात जागेवरच मृत्यू झाला. तर बलात्कार पीडित मुलीचे वडील निवृत्त सैनिक असून त्यांना पोलिसांनी अटक केलं आहे. न्यायालयाच्या आवारातच हा प्रकार घडल्यामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

न्यायालयाच्या आवारतच घातल्या गोळ्यामिळालेल्या माहितीनुसार मृत दिलशाद हुसैन उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिभीपुरा येथे वास्तव्यास होता. तो येथे पंक्चरचे दुकान चालवायचा. याच भागात 11 फेब्रुवारी 2020 साली एका निवृत्त सैनिकाच्या मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2020 रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात आरोपी दिलशाद हुसैनला पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केले होते. यावेळी पोलिसांनी हुसैनविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार तसेच अपहणाचा गुन्हा दाखल केला होता. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे आरोपी हुसैन मागील दोन वर्षांपासून तुरुंगात होता. मात्र काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या