Breaking News

मकरसंक्रांतीच्या दिवशी माऊली मंदिर दर्शनासाठी बंद


आळंदी : 

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिर येत्या 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी दर्शनासाठी बंद असणार आहे असे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी आळंदी आणि पंचक्रोशीतील तसेच राज्यभरातून अनेक महिला माऊलींना ओवसा घेऊन येत असतात या दिवशी संपूर्ण आळंदी शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. सध्या महाराष्ट्रात कोविड 19 विषाणूच्या ओमायक्राॅन व्हॅरियंटरचा संसर्गजन्य प्रादुर्भावामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने माऊलींचे समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


 याकाळात भाविकांना युट्युब आणि संस्थानच्या फेसबुक पेजवरून थेट माऊलींचे दर्शन घेता येईल असे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments