गँसचा स्फोट होवुन चार जण गंभीर जखमी घराचे छत उडाले

 


बेलापुर  (प्रतिनिधी ) :

 घरात गँसचा अचानक स्फोट झाल्यामुळे चार जण भाजुन गंभीर जखमी झाले असुन त्यांचेवर प्रवरानगर येथील दवाखान्यात उपचार सुरु आहे. या स्फोटाबाबत परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. या बाबत मिळालेली माहीती अशी की बेलापुर येथील जाम मस्जिदच्या पाठीमागे असणाऱ्या गाढे गल्लीतील शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता जोरदार स्फोट झाला या आवाजाने परिसर दणाणून गेला या ठिकाणी शशीकांत अशोक शेलार वय वर्ष 43 सौ ज्योती अशोक शेलार  वय वर्ष 38 यश अशोक शेलार वय वर्ष 16 नमश्री अशोक शेलार वय वर्ष 8 हे चौघे जण कर्डीले यांचे खोलीत भाडेकरु म्हणून रहात होते शशीकांत शेलार याचा औषधाचा व्यवसाय आहे आज सकाळी साडे सहा वाजता सौ ज्योती अशोक शेलार यांनी शेगडी पेटविली असता भयानक स्फोट झाला हा स्फोट ईतका भयानक होता की  त्यांच्या घरावर असलेले पत्र्याचे छत दुर उडाले एक एक पत्रा सुटा होवुन दुर उडाला पत्र्यावर असलेल्या वरांड्या खाली कोसळल्या त्यामुळे नमश्री जखमी झाली तसेच आगीमुळे चौघेही जण होरपळले स्फोटाचा आवाज येताच आजुबाजुचे लोक मदतीला धावले जखमींना तातडीने साखर कामगार रुग्णालयात भरती केले त्या नंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी प्रवरा मेडीकल ट्रस्ट येथे दाखल केले आहे जखमींची प्रकृती स्थिर आहे . घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधिकारी दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप बेलापुर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी घटनास्थळास भेट दिली घटनेचे गांभिर्य


ओळखुन ए टी एस व ए टी सी पथकानेही घटनास्थळी भेट दिली कामगार तलाठी व मंडलाधिकारी यांनीही घटनास्थळी भेट दिली .तसेच दवाखान्यात जावुन जखमींची विचारपुस केली या घटनेबाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू असुन गँस लिक असल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी पोलीस सर्व शक्यता पडताळून पहात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या