पथसंचलन पाहण्यासाठी फक्त 24 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था, प्रजासत्ताक दिनी यंत्रणा अलर्टवर

 





संचलन पाहण्यासाठी 24 हजार लोकांना उपस्थित राहण्याची मुभा

देशात सध्या कोरोनाचा कहर वाढला आहे. तिसरी लाट हाताच्या बाहेर जाऊ नये म्हणून लसीकरण तसेच प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मात्र दिल्लीमधील राजपथावर होणाऱ्या शानदार संचलनाचा नेत्रदिपक सोहळा पाहण्यासाठी फक्त 24 हजार लोकांना उपस्थित राहता येणार आहे. कोरोनामुळे या कार्यक्रमासाठी राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर निर्बंध आणण्यात आहे आहेत. दुसरीकडे विविध देशातील प्रमुख पाहुणेही यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित असणार नाहीत. गेल्यावर्षी 26 जानेवारी रोजी 25 हजार लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यावेळी फक्त 24 हजार लोकांनाच बसण्याची सोय करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या