शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्याग्रह आंदोलन

 शिरूर : शेतकऱ्याच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी महावितरण कार्यालयासमोर पाबळफाटा येथे रविवार दि.२३ रोजी पासुन सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी,पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोद,संपर्क प्रमुख बाबुराव पाचंगे,अल्पसंख्यांक सह प्रदेशाध्यक्षा रेश्मा शेख,कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, नगरसेवक मंगेश खांडरे, मनसेचे अविनाश घोगरे,विजय नरके,उमेश शेळके, करण खांडरे, सुवर्णा खेडकर, ग्राहक पंचायतचे तालुका संघटक संपत फराटे, दिलावर शेख, निलेश नवले, कापरे, अशोक शेळके उपस्थित होते. 


कृषीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे थांबवा.वीज पोल,ट्रान्सफार्मर,हायटेंशन पोलची नुकसान भरपाई द्या.२७ हे २००५ च्या शासन निर्णयाप्रमाणे सवलतीच्या दराने दिलेल्या कृषी वीज बिलाचा हिशोब द्या यांसह शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी महावितरणच्या विरोधात रविवार पासुन सत्याग्रह आंदोलन सुरु केले असून पहिल्या टप्प्यात दि.२३ ते २५ या तीन दिवस धरणे व त्यानंतर दुसरा टप्प्यात अमरण उपोषण आंदोलन तर आंदोलनाचा तिसरा टप्पा गोपनीय असणार असल्याचे यावेळी बोलताना पाचंगे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या