गेवराई तालुक्यात दिवसा ढवळ्या दरोडा..


रोख रक्कम व सोन्यासह लाखोंचा ऐवज पळवला...


शिरुरकासार : 
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात तांदळा येथे दोन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला आहे. ज्ञानेश्वर गवते यांच्या घरी दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील १५ तोळे सोने, रोख २० हजार असा ७ लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला. तर दुसरी घटना येथून जवळच असलेल्या तिंतरवणी येथे घडली असून येथेही चोरट्यांनी नगदी ५४ हजारासह १३ तोळे सोने असा लाखोंचा ऐवज चोरुन नेला. या तिन्हीं घटना बुधवारी दुपारी चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत घडल्या असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. तर परिसरातील नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन श्वान पथक तसेच फिंगर प्रिंट पथकाला घटनास्थळी पाचारण केले होते. गेवराई तालुक्यातील ज्ञानेश्वर गवते यांचे कल्याण विशाखापट्टणम महामार्गालगत घर आहे. बुधवारी ते शेतात ऊसतोडणी सुरु असल्याने कुटूंबासह शेतात गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास आई एका खोलीत झोपल्या असल्याचे पाहून या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दुसऱ्या एका रुमचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी कपाटातील १५ तोळे सोने रोख १६ हजार असा जवळपास ७ लाखांचा ऐवज लुटून पोबारा केला. दरम्यान राजेंद्र गवते यांच्या आईला जाग आल्यानंतर अस्ताव्यस्त पडलेल्या सामान पाहिले व घटना उघडकीस आली. तेथून काही अंतरावर दिनकर हकाळे यांच्या घरीही कोणी नसल्याचा फायदा घेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील रोख रक्कम २० हजार रूपये घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
या घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचान्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच याठिकाणी श्वान पथकासह फिंगर प्रींट पथकाला पाचारण केले होते. सायंकाळी उशिरा याठिकाणी हे पथक दाखल झाले होते. मात्र श्वानपथकाला चोरट्यांचा माग काढण्यात अपयश आले. भरदिवसा दुपारी राष्ट्रीय महार्गावर घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर तिसरा घटना येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या तिंतरवणी येथे घडली. याठिकाणी विष्णू नागरगोजे यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. घरात असलेले रोख रक्कम व सोने असा लाखोंचा ऐवज लुटून चोरट्यांनी पोबारा केला. याठिकाणी अंदाजे १३ तोळे सोने व रोख रक्कम ५४ हजार चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच दिवशी तीन ठिकाणी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांनी एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी करुन लाखोंचा ऐवज लुटत पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे.

तांदळा व तिंतरवणी या दोन्ही ठिकाणी घडलेल्या घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान या तीनही चोरीच्या घटनेचा तपास लवकर लावू असे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या