सरसकट शाळा बंद करु नये, शिक्षकांची मागणी

पुणे- करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेताना शासनाने घाई केल्याचे सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत असतानाच परिस्थितीनुसार शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची मुभा का नाही, कार्यक्रमांना ५० टक्के लोकांना प्रवेश दिला असल्यास ५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश का नाही, असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.


राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला नसताना सरसकट शाळा बंद करण्यातून विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मतही मांडण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत करोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यात ओमायक्रॉन या उत्परिवर्तनाचेही रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अध्यापनाचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागात अद्याप करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला नसताना सरसकट शाळा बंद करणे योग्य नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या