कर्जबाजारीपणाला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या


बेलवंडी :
 श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील  पोलिसवाडी परिसरातील गंगाराम राधु डफळ वय ४२यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळुन आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी सात वाजणाच्या सुमारास येळपणे गावातील पोलिसवाडीतील सध्या शेती करणारे पण पुर्वी अध्यापक विद्यालयात प्राध्यापकाचे कामकाज करणारे  गंगाराम राधु डफळ वय ४२ यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे ठोस कारण समजु शकले नाही पंरतु बँक ,व खाजगी सावकार यांच्या कर्जबाजारीपणा कंटाळुन आत्महत्या केल्याची चर्चा परीसरात होत आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी ,व दोन मुले आहेत.  बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलीसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली.

Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या