२ कोटींचा अपहार करून फरार असलेल्या आरोपीला अटक

कर्जत : २ कोटी १० लाख रुपयांचा अपहार करून सुमारे एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस कर्जत पोलिसांनी जेरबंद करून करमाळा पोलीसांच्या हवाली केले. या


बाबत कर्जत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा येथील बंधन बँक शाखेतील घोटाळ्याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर १६१/२०२१ भादवि कलम ४२०, ४०९, ३४ प्रमाणे दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी अजित लाला जगताप (वय २८ वर्षे रा. राशीन ता. कर्जत) हा सदर गुन्हा घडल्यापासून फरार होता. शनिवार, दि २२ रोजी रात्र गस्तीवरील पोलीस पथकाला गस्त घालत असताना मिळून आला. आरोपी अजित जगताप विषयी अधिक माहिती घेतली असता, तो करमाळा पोलिस स्टेशनच्या वरील प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. त्यास तात्काळ ताब्यात घेत करमाळा पोलिस ठाण्याचे अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा तसेच मोठ्या रकमेचा असल्याने सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस अमलदार पांडुरंग भांडवलकर, नितीन नरोटे, अमित बर्डे , अण्णासाहेब चव्हाण यांनी पार पाडली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या