लतादीदींच्या प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका


निर्मात्या अनुषा श्रीनिवासन यांचं आवाहन

मुंबई – प्रख्यात गायिका लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, कोविड -19 मधून बरे झाल्या आहेत. तरीही त्याच्यावरची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लत्ता मंगेशकर यांच्याबाबत पसरत असलेल्या खोट्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेऊ नका. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. लता दीदी बऱ्या होऊन घरी येण्यासाठी प्रार्थना करूया अशी पोस्ट चित्रपट निर्मात्या आणि लेखक अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी केली आहे.लत्ता दीदींना 9 जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या सद्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत. पण काही समाजकंटकांनी खोट्या बातम्या पसरवल्या आहेत, अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. त्या लवकर ब-या होण्यासाठी पार्थना करा असं एका पोस्टमध्ये अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी चाहत्यांना सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या