औरंगाबादः वंशाला दिवा हवा म्हणून आईच्या गर्भातच निष्पाप कोवळ्या मुलींचा गर्भपात केला जातो. मात्र औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी परिसरात मुलगा नसताना पाच मुलींनी आपल्या जन्मदात्या बापाच्या अंत्यविधी यात्रेला खांदा देत पाणी पाजून समाजासमोर एकाप्रकारे आदर्श ठेवला आहे.
ही घटना वाळूज परिसरातील तिसगाव म्हाडा कॉलनीतील कासलीवाल फ्लोरा येथे घडली आहे. या भागात राहणाऱ्या ७२ वर्षीय पुरुषोत्तम खंडेलवाल यांचं १९ जानेवारी रोजी सकाळी साडेआठवाजेच्या दरम्यान निधन झालं. यावेळी अंत्यविधीची तयारी झाली असताना, मुलगा नसल्याने त्यांना खांदा कोण देणार असा प्रश्न नातेवाईकांसमोर निर्माण झाला. मात्र याचवेळी खंडेलवाल यांच्या पाच मुली रेखा, राखी, राणी, आरती आणि पुजा यांनी खांदा देत अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.
अनेकदा मुलगा असावा ह्या हट्टापायी अनेकजण मुलीचा गर्भपात करतात. तर काही जण नवजात मुलीला फेकून देतात. पण खंडेलवाल यांच्या पाचही मुलींनी आपल्याला भाऊ नाही असे म्हणत बसण्यापेक्षा हिम्मत दाखवत जन्मदात्या बापाचा शेवटचा अंत्यविधी पार पाडला. त्यामुळे या पाचही बहिणीनंच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या