Breaking News

टॉस जिंकला... इतिहास रचला!

केपटाउन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीला आज मंगळवारपासून केपटाउन येथे सुरूवात झाली आहे. ३ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने ही लढत निर्णायक ठरणार आहे. तिसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आणि त्याच बरोबर एक नवा विक्रम देखील केला. तिसऱ्या कसोटीत टॉस जिंकताच विराटने इतिहास घडवला. भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग १०व्यांदा टॉस जिंकला आहे. याच बरोबर भारताने ८ वर्षापूर्वीच्या स्वत:च्या विक्रमाशी बरोबरी केली. टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा सलग १० वेळा टॉस जिंकला आहे. 


Post a Comment

0 Comments