सर्व दुकाने, हॉटेल्स आणि पर्यटनस्थळे आजपासून खुली

पुणे-  ओमिक्रॉन व्हेरिएंट चा प्रसार वेगाने होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात निर्बंध लावण्यात आले होते. मागील काही दिवसातील परिस्थिती पाहता पुणे जिल्ह्यात काही निर्बंध उठवण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेले सर्व दुकाने, हॉटेल्स आणि पर्यटनस्थळे आजपासून खुली करण्यात येत आहेत असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जाहीर केले आहे. या आदेशानुसार लागू असलेले कलम १४४ रद्द करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यासह  मावळातील पर्यटनस्थळे आजपासून खुली करण्याचे तसेच लोणावळा परिसरातील दुकाने खुली करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  यांनी दिले आहेत. मावळ मधील लोणावळा हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. या पर्यटनस्थळांवर छोट्या व्यावसायकांना व्यावसाय करण्याची मुबा द्या अशा सूचना राज्याचे पालकमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल जिल्हा आढावा बैठकीत दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी पुणे यांनी पंधरा दिवसांपुर्वी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी लोणावळा शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट व इतर व्यावसाय निम्म्या क्षमतेने सुरु असताना केवळ पर्यटनस्थळे बंद ठेवून त्या परिसरात व्यावसाय करणार्‍या लहान व्यावसायिकांवर जिल्हा प्रशासनाकडून अन्याय केला जात असल्याचा मुद्दा मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी उपस्थित केला होता. यावर अजित पवार याबाबत मागणी ही करण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्याच्या आढावा बैठकीपुर्वी मावळचे आमदार सुनील शेळके  यांनी अजितदादांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच, दादांनी तात्काळ निर्णय घेत पर्यटन स्थळांवरील लहान व्यावसायिकांना व्यावसाय सुरु करण्याची मुबा द्या अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे लोणावळ्यातील लायन्स पॉईट, भुशी धरण, राजमाची किल्ला, लोहगड, विसापुर किल्ला, पवना धरण परिसर व आंदर मावळ परिसरात पर्यटनस्थळी व्यावसाय करणार्‍या लहान व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

चौकट
जिल्हाधिकारी यांनी आज सदरचा आदेश दिल्याने आज पासून अधिकृतपणे पर्यटनस्थळे आणि त्याठिकाणची दुकाने सुरु होणार आहेत. असे असले तरी व्यावसायिक व पर्यटक या सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, एकाच ठिकाणी जास्त गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या