मनपाच्या दुर्लक्षामुळे जॉगिंग पार्कला काटेरी जंगलाचे स्वरूप

       


                                   
                                           

नगर (प्रतिनिधी)-  आगरकर मळा येथील झेडपी कॉलनी येथे कोरोनामुळे दीड वर्षापासून बंद असलेले जॉगिंग पार्कमध्ये मोठी दुरवस्था निर्माण झाली असताना येथे पूर्णपणे जंगलाचे स्वरूप निर्माण झाले आहे. येथे तातडीने या जॉगिंग पार्कची स्वच्छता करून सर्व सोयी सुविधा पुरवण्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे यांनी केली आहे.                                                                                                                                    आरोग्य उत्तम राहण्यासाठी परिसरातील नागरिक सकाळी व संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी व मोकळ्या हवेत घेण्यासाठी येत असतात मात्र गेल्या दीड वर्षांपासून जॉगिंग पार्क बंद असल्याने अनेक प्रकारे दुरवस्था निर्माण झाली आहे पावसाने गवत व काटेरी झाडे वाढली आहे. तसेच ट्रक वरती सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहे व तेथे घाण साचली असुन पार्कची स्वच्छता करून या जॉगिंग पार्कची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी महानगरपालिकेने कर्मचारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मनपा आयुक्त यांच्या दालनात नागरिकांसमवेत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या