Breaking News

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या


वैजापूर : 
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता.१९ रोजी तालुक्यातील सवंदगाव शिवारात सकाळच्या सुमारास 

उघडकीस आली. कल्पना संदीप कदम असे घटनेतील मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी संदीप कदम (पती), माणिक कदम (सासरा), शांताबाई कदम (सासु) सर्व रा.परसोडा शिवार, किशोर शिंदे व किशोर शिंदे याची पत्नी (पूर्ण नाव माहीत नाही) दोघे रा.वैजापूर ग्रामीण यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिंंबक गायकवाड रा.कुंजखेडा ता.कन्नड यांंची मुलगी कल्पना हिचा विवाह दहा वर्षांपूर्वी परसोडा येथील संदीप कदम याच्यासोबत पार पडला. लग्न झाल्यापासून पती, सासु, सासरे हे सतत 'माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आण' अशी मागणी तिच्याकडे करू लागले. शिवाय 'तुला घरातले काम बरोबर येत नाही, तू आळशी आहे' असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. सणावाराला माहेरी आल्यानंतर सुरू असलेला सर्व प्रकार कल्पना आई-वडिलांना सांगत. मात्र ते तिची समजूत काढून पुन्हा तिला सासरी पाठवत. दरम्यान कल्पना हिचा भाऊ गणेश याची मुलगी अनुष्का ही परसोडा येथे मुक्कामी आली. १७ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता संदीप याने विवाहितेच्या भावाला फोन करून 'कल्पना ही कालपासून घरातून निघून गेली आहे' असे सांगितले. यामुळे गणेश व त्याचा चुलतभाऊ दिलीप गायकवाड  हे बहिणीचा शोध घेण्यासाठी परसोडा शिवारात आले. यावेळी गणेशने मुलगी अनुष्का हिच्याकडे चौकशी केली असता 'काल रात्री मामा संदीप, त्याचे आई-वडील, किशोर व त्याची बायको यांनी आत्याला शिवीगाळ करून मारहाण केली त्यामुळे आत्या रागाच्याभरात कुठेतरी निघून गेल्या' असे तिने सांगितले. यामुळे त्यांनी नातेवाईकांकडे बहिणीचा शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाही. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. १९ जानेवारी रोजी गणेश याला सवंदगाव येथील नातेवाईकांचा फोन आला व परिसरातील एका विहिरीत महिला मृत अवस्थेत मृत अवस्थेत मिळून आल्याचे त्याला सांगितले. यावेळी माहेरच्यांंनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता मृतदेह हा कल्पना हिचा असल्याचा त्यांना समजले.  पोलिस पाटील व इतर लोकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. त्रिंंबक गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments