वीज कंत्राटी कामगार संघचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा


पुणे :

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या न सुटल्यास, अधिवेशन काळात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ राज्यव्यापी आंदोलन छेडणार, असा इशारा संघाच्या कार्यकारिणी बैठकीत देण्यात आला.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न (भारतीय मजदूर संघ) केंद्रीय व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी (दि.09) पुण्यात पार पडली.

महाविकास आघाडी सरकारने वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. प्रामाणिक काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या वेतनावर संगनमताने डल्ला मारणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले पाहिजे, कंत्राटदारांवर वरदहस्त न ठेवता त्यांना दंड केला पाहिजे. अशी भूमिका 27 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या