माजी मंत्री अशोकराव सावंत यांना मातृशोक


पारनेर  : 
 पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर देवस्थानचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री अशोकराव सावंत यांच्या मातोश्री सौ.मालन उर्फ सिताबाई साहेबराव सावंत देशमुख वय वर्षे ७५ यांचे  मंगळवार दि.४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३:३० वाजता ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने दुःखत निधन झाले.

            त्यांच्या पश्चात पति साहेबराव लालजी सावंत,दिर माणिकराव लालजी सावंत,मलगा अशोक साहेबराव सावंत,अरुण साहेबराव सावंत ,उत्तम साहेबराव सावंत  अशी ३ मुले,तसेच ३ पुतणे, सुना,नातवंड, नातसुन असा मोठा परिवार आहे. मातोश्री सिताबाई सावंत या उत्तम ग्रहीणी असुन, धार्मिक वृत्तीच्या होत्या. माजी राज्यमंत्री अशोकराव सावंत यांना राजकीय आणि सामाजिक तसेच धार्मिक जीवनात काम करण्यासाठी त्या वेळोवेळी मार्गदर्शन करायच्या.त्यांच्या जाण्यामुळे सावंत परीवारासह पिंपळनेर गावावर शोककळा पसरली आहे.पारनेर नगरसह संपूर्ण राज्यामधुन त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या