बंद घर फोडून दिवसाढवळ्या चोरी


मांडवगण फराटा : 
शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी केलेल्या चोरीत रोख रक्कम व दागिने असे मिळून एकूण २लाख ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे.याबाबत हर्षदा संदीप येळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिरसगाव काटा येथील येळेवस्तीवर दि.२०रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्यानी कुलूप तोडून प्रवेश करून चोरी केली आहे.या चोरीत रोख रक्कम १ लाख रुपये,सव्वा तोळे वजनाचे ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चैन, ४५ हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या  सहा सोन्याच्या रींगा,४५ हजार रुपये किमतीच्या १०ग्रॅम वजनाची दहा सोन्याचे बदाम असा एकूण सुमारे २ लाख ५०हजार  रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
या प्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या