शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन राजकारण तापलं!

 


अमरावती : अमरावतीत राजकारण तापलंय. आज पहाटे अमरावतीमध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. रवी राणा यांनी विनापरवाना हा पुतळा उभारल्यानं या पुतळ्यावर पोलिसांनी कारवाई करत हा पुतळा हटवला होता. त्यानंतर बराच वेळ नवनीत राणा आणि रवी राणा यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे  आणि शिवसेनेवर  टीका करण्यात आली आहे. यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या कारणावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवप्रेमींच्या मागणीखातर हा पुतळा उभारल्याचं राणा दाम्पत्यानं माध्यमांशी बोलताना म्हटलंय. यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना नंतर ताब्यातही घेण्यात आलंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या