जेष्ठांच्या समस्यांवर कृतीतून अंमलबजावणी आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा संकल्प


पुणे :


ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असून, त्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून अंमलबजावणी करत असल्याचा संकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी आ. पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या मोबाईल प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ एरंडवणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात झाला. यावेळी आ. पाटील यांनी आपला संकल्प व्यक्त केला.

यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, शिक्षण मंडळ अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक जयंत भावे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या डॉ. अलकनंदा बानू आदी उपस्थित होते.
 पाटील म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. त्यामुळे केवळ त्यांना आश्वसने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून अंमलबजावणी करत आहे. यातूनच मोबाईल प्रशिक्षण शिबीर सुरु करत असून, या शिबीरामुळे ज्येष्ठ नागरिकांना अॅड्राईंड मोबाईल वापरताना येणाऱ्या सर्वप्रकारच्या अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल. तसेच कोथरुड मतदारसंघात भविष्यात ही असे विविध उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे.
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या