गावठी दारूभट्टीवर छापा १२ लाखांचा माल जप्त : तिघांवर गुन्हा


इंदापूर :
तालुक्यातील रेडा गावच्या हद्दीत छापा टाकून इंदापूर पोलीसांनी तयार गावठी दारु, कच्चे रसायन व भट्टीसाठी लागणारे साहित्य असा १२ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांवर गुन्हा दाखल केला. एक जणास ताब्यात घेतले. बुधवारी (दि. १९) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.


दीपक बाबुराव शिंदे, फरदीन फिरोज पठाण, समाधान साबळे (तिघे रा. चांदापुरी ता.माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दीपक शिंदे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विकास राखुंडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी सांगितले की, रेडा गावच्या हद्दीत कालव्यालगत झाडीच्या आडोश्याला मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु काढली जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. तिच्या आधारे त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेथे विजेच्या खांबावर आकडा टाकुन केबलद्वारे सिंगल फेज इलेक्ट्रीक मोटारचा वापर करुन दारु काढली जात असल्याचे दिसून आले. पोलीसांनी सर्व साहित्य जप्त केले आहे. पंचासमक्ष दारु नष्ट करण्यात आली. तीन आरोपींपैकी एक जण सापडला, असे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या