लग्नासाठी खरेदी करून घरी जाताना भिषण अपघात,
नवरीचा जागीच मृत्यू तर भाऊ जखमी !
पाटस ; पुणे सोलापूर महामार्गावर पाटस जवळील कवठीचा मळा येथे दुचाकीवरून घरी जात असलेल्या लग्नाच्या खरेदीसाठी बहीणभावाला महामार्गावरून भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात हायवा वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.या अपघातात तीनच दिवसातच नवरी होणाऱ्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ जखमी झाला आहे.
दौंड तालुक्यातील मलठण येथील प्रतिक्षा सदाशिव कांबळे ( वय १९) असे या मृत्यू युवती चे नाव असून शुभम सदाशिव कांबळे (वय २३ ) असे या अपघात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.बुधवारी (दि.१९) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. हे दोघे ही बहिण भाऊ पुणे येथुन लग्नाची खरेदी करून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून वरवंड बाजुंकडून पाटस बाजुकडे मलठणला घरी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.
प्रतिक्षा हिचे दोन तीन दिवसांवर विवाह होता.मात्र या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी तातडीने पाटस पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवले.पोलीस हवालदार सुनील बगाडे, अजित इंगोले, घनश्याम चव्हाण,समीर भालेराव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यवत पोलीस ठाण्यात हायवा वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे
0 टिप्पण्या