दोन एकर ऊस जळाला, तीन लाखाचे नुकसान

पुणतांबा

 चांगदेवनगर येथील सव्हें नंबर२०३ - २ ब - २ मधील अप्पासाहेब पंढरीनाथ सांबारे व बाळासाहेब जगन्नाथ सांबारे याचा तोडणी योग्य ऊस जळाल्यामुळे अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. काल दुपारच्या वेळेस ऊसाने अचानक पेट घेतल्यामुळे सांबारे वस्ती व परिसरातील शेतकरी वर्गाच्या लक्षात येताच मोठ्या संख्येने शेतकरी आग विझविण्यासाठी धावले मोठया प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मात्र आगीमुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागून नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. हया आगीची चौकशी करून जळालेल्या ऊसाचा पंचनामा करावा अशी मागणी सांबारे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या