‘भाई’ म्हणाला नाही म्हणून खायला लावली जमिनीवरची बिस्कीटे; मुंडन करून पोलिसांनी काढली धिंड


एका गुन्हेगाराने भाई म्हणाला नाही म्हणून चक्क तरूणाला जमिनीवरील बिस्किट तोंडाने उचलायला लावले. परंतु, आज या प्रकरणातील तीन आरोपींचे मुंडन करून वाकड पोलिसांनी धिंड काढली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक  घटना घडली आहे. एका गुन्हेगाराने भाई म्हणाला नाही म्हणून चक्क तरूणाला जमिनीवरील बिस्किट तोंडाने उचलायला लावले. परंतु, आज या प्रकरणातील तीन आरोपींचे मुंडन करून वाकड पोलिसांनी धिंड काढली.

पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव येथील गणेशनगर भागात 25 जानेवारीला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. गाव गुंडांच्या टोळक्याने संबंधित तरुणाला इमारतीच्या टेरेसवर नेऊन, कमरेच्या बेल्टने व लाठ्या-काठ्यांनी व बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शिवाय जमिनीवर बिस्किटे टाकून कुत्र्याप्रमाणे ती बिस्किटे खाण्यास भाग पाडले. या गावगुंडांनी या घटनेचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर वायरल देखील केला आहे.

या प्रकरणी वाकड पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यातील तीन जण अल्पवयीन मुले आहेत. रोहन वाघमारे या सराईत गुन्हेगारासह प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव ), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फोनवर भाई म्हणाला नाही म्हणून रोहन वाघमारे याने एका तरुणाला बोलावून घेतलं. आपल्याला भाई का म्हणाला नाही असा जाब रोहन याने संबंधित तरूणला विचारला. याशिवाय त्या तरूणाल बेदम मारहाण करत तोंडाने जमिनीवरचे बिस्कीट उचलायला लावले. या घटनेनंतर संबंधित तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात रोहन वाघमारे आणि इतर सहा जणांच्या विरोधात तक्रात दाखल केली. 

संबंधित तरूणाच्या तक्रारीवरून वाकड पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आणि  ज्या ठिकाणी तरूणाला बिस्कीट उचलायला लावले त्याच ठिकाणी तीन आरोपींची धिंड काढली. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मुंडन करून घटना घडलेल्या ठिकाणापासून परिसरात त्यांची धिंड काढली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या