श्रीरामपूर मिनी स्टेडियम : ७० गाळे धारकांनी नगर पालिकेचे ३५ लाख थकवीले


१ फेब्रुवारीपासून गाळे सील : पालिकेचा वसुली विभाग सुस्त


श्रीरामपूर : न्यायालया शेजारील श्रीरामपूर नगरपालिकेच्या मिनी स्टेडियम मधील सुमारे ७० गाळेधारकांनी नगरपालिकेचे सुमारे ३५ लाख रुपयांचे टॅक्स (भाडे) थकविले आहे. दरम्यान १ फेब्रुवारीपासून वसुलीसाठी थेट गाळे सील करण्याची मोहीम पालिकेचा वसुली पथक हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेचे संत लूक हॉस्पिटल रस्त्यावरील न्यायालया शेजारी मिनी स्टेडियम आहे.त्यात भव्य गाळे उभारण्यात आले आहेत. यात असलेल्या १०३ गाळयांपैकी ३० ते ३५  गाळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत.
 स्व. जयंत ससाणे यांच्या काळात हे मिनी स्टेडियम बांधले गेले आहे. यातील अनेक गाळे आजही सोयी सुविधांअभावी बंद अवस्थेत आहेत.
भाडे थकबाकीदारांमध्ये माजी  नगरसेवक, त्यांचे नातेवाईक, विविध पक्षांचे पदाधिकारी, काही माजी सरकारी आणि इतर वकील, विविध संस्था अशा अनेकांचा सहभाग आहे.
सदरची थकबाकी ही गेल्या १० ते १२  वर्षापासूनची थकीत आहे. सदरची थकबाकी वाढत असतांना नगरपालिकेच्या वसुली विभा गातील  अधिकारी-कर्मचारी यांनी या मिनी स्टेडियम मधील थक बाकी दारांकडे  असलेल्या वसुली संदर्भात केलेल्या कारवाई बाबत शंका व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या या मालमत्ते सह संपूर्ण शहरभर इतरही मालमत्तां धारकांकडून लाखो रुपयांची थकबाकी पालिकेला येणे आहे. वसुली विभाग या थकबाकी धारकांना पाठीशी घालत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदरची कोट्यावधी रुपयांची थकबाकी वेळेवर वसूल होत नसल्यामुळे पालिकेच्या विकास कामांवर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचे पालिकेचे काही अधिकारी आणि माजी पदाधिकारी खाजगीत बोलतात.       नगरपालिकेच्या  वसुली विभागाने मिनी स्टेडियम मधील गाळेधारकाकडे असलेल्या वसुलीसाठी या सर्व भोगवटादार गाळेधारकांना गेल्या १५ दिवसापूर्वी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र ही थकबाकी भरण्यासाठी अद्यापही कुणी पुढे आले नाहीत.
सर्वाधिक ४ लाख रुपये तर कमीत कमी ६ हजार अशी थकबाकीची मी यामिनी स्टेडियम मधील गाळे धारकांकडे रक्कम आहे.    
 प्रांताधिकारी अनिल पवार यांनी या पालिकेची प्रशासक म्हणून  सूत्रे स्वीकारली आहेत. या वसुलीसाठी ते काय आणि कितपत प्रयत्न करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पाणी पालिकेने संपूर्ण शहरभर या व अशा अनेक मालमत्ता धारकांकडे असलेल्या थकबाकीसाठी गाळे सील करण्याची  मोहीम हाती घेऊ, अशी वारंवार गर्जना केली आहे. मात्र त्यानंतरही थकबाकी वाढतच राहिली, ही बाब आश्चर्यकारक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या