केवळ 11 हजार डोस शिल्लक,
पुणे- शहरात सोमवारपासून 60 वर्षांवरील व्याधीग्रस्त, हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी तिसरा म्हणजे 'बुस्टर' डोस सुरू झाला आहे. यांच्यासाठीची अतिरिक्त लस महापालिकेला मिळालेली नाही. त्यामुळे जुन्या स्टॉकवर महापालिकेला तिसरा डोस द्यावा लागत आहे. तिसरा डोस सुरू झाला असला तरी अजून नवीन स्टॉक न आल्यामुळे विशेष करून कोवॅक्सिनचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.कोवीशिल्ड लसीचे मात्र 87 हजार डोस शिल्लक आहेत.
सध्या कोवॅक्सिन ही लस 15 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यात येत आहे. तसेच ज्यांना दोन्ही डोस दिले आहेत आणि नऊ महिने पूर्ण झाले आहेत, त्यांनाही तिसरा डोस देण्यात येत आहे. यामुळे या लसीची मागणी वाढली आहे. म्हणून या लसीचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. सध्या 179 केंद्रांवर मुलांना कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. तर 40 केंद्रांवर साठ वर्षांच्या पुढील नागरिक, हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर यांना तिसरा डोस देण्यात येत आहे.
शहरात कोवॅक्सिन लसीचा तुटवडा असून, त्याचे केवळ 11 हजार डोसच महापालिकेकडे शिल्लक आहेत. आणखी दोन दिवस लस येणार नसल्याने पुढील दोन दिवस पुरणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चौकट
* राज्याकडे लसीचा स्टॉक उपलब्ध आहे. दरम्यान दोन दिवसानंतर कोवॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध होईल, असे राज्याकडून सांगण्यात आले आहे. शहरांमध्ये पुरेसा लसीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी सेंटर सुरू राहतील, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.
चौकट
केवळ 11 हजार डोस शिल्लक
सध्या महापालिकेकडे अकरा हजार कोवॅक्सिनचे डोस शिल्लक आहेत, तर 87 हजार कोविशिल्डचे डोस शिल्लक आहे. लसींची कमतरता असल्याने मंगळवारी चाळीस केंद्रावरच कोवॅक्सिनचे डोस उपलब्ध असतील. येत्या दोन दिवसांत लसीचे डोस उपलब्ध होतील.
- डॉ. सूर्यकांत देवकर,
मुख्य लसीकरण अधिकारी, पुणे मनपा
0 Comments