''शिकू आनंदे" कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरणपूरक पतंग


नेवासा :

कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना व सध्या राज्यातील मुलांचे शिक्षण सुरू राहावे या उद्देशाने राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने ३ जुलै २०२१ पासून इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने कृतीतून आनंद व आनंदातून शिक्षण होण्यासाठी शिकू आनंदे हा उपक्रम सुरू करण्यात आला.
                       या ऑनलाईन   कार्यक्रमांमध्ये सूर्यनमस्कार, नृत्य, गीतगायन, पतंग निर्मिती  घटकांचे सादरीकरण एससीईआरटी च्या यूट्यूब चॅनल वरून सकाळी नऊ ते दहा व सहावी ते आठवी साठी दहा ते अकरा या वेळेत लाईव्ह प्रसारण उत्कृष्टरित्या करण्यात आले. त्यास राज्यातील विविध शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालक यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला तसेच देशातील व देशाबाहेरील मराठी भाषेत शाळेतील विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमासाठी प्रतिसाद मिळत आहे.
                         कार्यक्रमाचे प्रास्ताविक  परिषदेच्या सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभागाच्या प्राचार्य डॉ.नेहा बेलसरे यांनी करत शिकू आनंदे कार्यक्रमास अर्धवर्ष पूर्ती होत असल्याचे यावेळी सांगितले. या विशेष भागास प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर व एनसीईआरटी नवी दिल्लीच्या आर्ट डिपार्टमेंटच्या प्रमुख डॉ. पवन सुधीर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. 

याप्रसंगी संचालक टेमकर म्हणाले की, राज्यातील विविध शाळेत विद्यार्थी या कृती आनंदाने करत आहेत. अध्यापन करताना ते कृतीयुक्त आनंददायी झाल्यास शाळाबाह्य होण्याचे प्रमाण कमी होईल असे प्रतिपादन केले.                    
  यावेळी वर्गशिक्षक राहुल आठरे यांच्या सहकार्याने विविध आकाराचे कल्पकतेने पर्यावरण पूरक पतंगाची निर्मिती  विद्यार्थ्यांनी केली. या पतंगावर पर्यावरण संवर्धन,कोरोना प्रतिबंधक नियम,आजादी का अमृत महोत्सव घोषवाक्ये, लसीकरणाचे आव्हान आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा लिहून  पतंगावर संदेश दिले.
        शिकू आनंदे(लर्न विथ फन) या अभिनव उपक्रमास एससीईआरटी पुणेचे संचालक एम. देवेंदर सिंह, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक तथा विभाग प्रमुख प्राचार्या डॉ.नेहा बेलसरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे,विकास गरड, उपविभाग प्रमुख सचिन चव्हाण,अधिव्याख्याता ज्योती राजपूत, विषय सहाय्यक पद्मजा लामरुड आदींसह तांत्रिक सहाय्य टीमचे विशेष मार्गदर्शन व कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभाग प्रमुख सचिन चव्हाण यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या