पुणे – कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कोरोना अजूनतरी आठ आठ दिवस तरी कोरोनाचा आकडेवारी खाली येणार नाही. त्यात पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हटी रेट 27 टक्के आहे. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करू नये या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
0 टिप्पण्या