सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव यांचा पुतळा लवकरच होणार

 


पुणे : ऑलम्पिकमध्ये देशाला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा पुणे विद्यापीठातील क्रीडा संकुलात पुतळा उभारला जाणार आहे. त्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाच्या  क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आतापर्यंत क्रीडा संकुलासाठी विद्यापीठानं 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये क्रीडा संकुलाचा इनडोअर विकास करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये देशाचे पहिले ऑलम्पिक वीर तसेच कराडचे पैलवान खाशाबा जाधव यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रियाा सुरु करण्यात आली आहे. विद्यापीठातील क्रीडा संकुलात हा पुतळा उभारला जाणार आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठाने आतापर्यंत क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये सुशोभिकरण तसेच वेगवेगळ्या खेळांच्या मैदानाची दुरुस्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने खर्च केलेल्या 50 कोटी रुपयांपैकी काही रक्कम ही विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेली आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये देशाला वैयक्तिक खेळात पहिले पदक देऊन संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली. त्यांच्या या कार्याची दखल तसेच भावी खेळाडूंना त्यांचा पुतळा एक प्रेरणा ठरवा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या