महिलांचे फोटो अश्लिल स्वरुपात व्हायरल करणाऱ्यास बेड्या, महिला आयोगाने पुणे पोलिसांना मागवला अहवाल

 


पुणे : महिला व मुलींचे फोटो काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील खडकी पोलिसांनी एका 25 वर्षी आरोपीस अटक केले आहे. वस्तीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या फोटोंमध्ये हा तरुण छेडछाड करायचा. आरोपीकडून अशा प्रकारे विकृत काम करण्यात येत असल्याचे समजताच पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या बुली बाई आणि सुल्ली डील हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात महिलांचे फोटो नग्न महिलांच्या फोटोवर लावण्याच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या