ज्येष्ठ गायिका किर्ती शिलेदार यांचं निधन 

 पुणे, प्रतिनिधी-ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात मोलाची कामागिरी केलेल्या किर्ती शिलेदार यांचं आज निधन झालं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डायलिसिसचे उपचार सुरू असल्याने त्यांची तब्येत आणखी खालावली संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. नाट्य संगीतातील त्यांच्या घराण्याचा वारसा कायम स्मरणात राहिल अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमीवरील जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे.  अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  कीर्ती शिलेदार यांना २०१४ सालचा महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार तसेच दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्कार मिळाला आहे.सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.

पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांच्ची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेनं कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीतं रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थानं बिनीच्या शिलेदार होत्या. 

विदेशात त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्यानं त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केलं होतं. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.संवाद पुणे च्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी शेवटची प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवली होती. किर्ती शिलेदार यांच्या भगिनी दिप्ती भोगले यांनी किर्ती शिलेदार यांच्या जीवनकार्यावर आधारीतनिर्मित केलेला माहितीपट नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने पत्रकार संघात आयोजीत कार्यक्रमात डॉ.जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आला होता. 

संवाद पुणेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या