अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा विकास स्थानिक विकास निधीतून करावा. -उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे

दौंड-सिध्दटेक रस्त्याच्या कामात लक्ष घालावे

अहमदनगर ः अष्टविना


यक तीर्थक्षेत्रांनी स्थानिक विकास निधींच्या माध्यमातून आपल्या तीर्थक्षेत्रातील स्वच्छता,पाणी इतर सोयी-सुविधांची कामे करण्यावर भर द्यावा. अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित बैठकीत केल्या.

राज्यातील मोरगांव, थेऊर, सिध्दटेक, महड, पाली, ओझर, लेण्याद्री व राजणगाव या अष्टविनायक विकास आरखडा संदर्भात श्रीमती नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 10 जानेवारी रोजी दूरदृश्य प्रणालींच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला अहमदनगर येथून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र क्षीरसागर,जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार, कर्जत तालुक्यातील सिध्दटेक ग्रामपंचायत सरपंच अमोल भोसले उपस्थित होते. तसेच पुणे व रायगड जिल्ह्यातील अनुक्रमे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, स्वत; जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अष्टविनायक क्षेत्रातील तालुक्यातील तहसीलदार,  गावांचे सरपंच, विश्वस्त, मंत्रालयातून पर्यटन व ग्रामविकास विभागाचे उपसचिव आदी उपस्थित होते. 

जिल्हयातील कर्जत तालुक्यातील सिध्दटेक या अष्टविनायक क्षेत्रापैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्रातील कामकाजाचा आढावा घेतांना श्रीमती नीलम गोर्‍हे म्हणाल्या, दौंड ते सिध्दटेक रस्त्याचे काम लवकरात लवकर होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे. सिध्दटेक मधील अंतर्गत रस्त्यांचे काम रोजगार  हमी योजनेतील करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. मंदीर परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. पुरेशा प्रमाणात प्रकाश पडावा यासाठी दिव्यांची व्यवस्था करण्यात यावी. नदी घाटाचे सुशोभीकरण करण्यात यावे. तसेच कोवीड-19 पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भाविकांकडून नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. 

तीर्थक्षेत्र परिसरातील कामे करण्यासाठी राज्यशासन कटीबध्द आहे. आवश्यक कामांना निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र इतर सोयी-सुविधांची कामे स्थानिक नगरपंचायती, ग्रामपंचायती, जिल्हा नियोजन निधी  अंतर्गत असललेल्या निधीच्या माध्यमातून करण्यात यावी. तसेच देवस्थान निधीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात यावे. देवस्थान मधील सोलर सिस्टीम, वॉटर प्युरीफायर साठी सीएसआर मधून निधी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावा. देवस्थान मधील निर्माल्य ची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. अशा सूचना ही नीलम गोर्‍हे यांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.भोसले म्हणाले, सिध्दटेक मधील घाट काम, नदी किनारे स्वच्छ करणे, वाहनतळ निर्माण करणे आदी कामांसाठी 29 कोटी 34 लाखांचा सुधारित आराखडा सादर करण्यात आला. आहे. इतर छोटी कामे खासदार, आमदार व स्थानिक विकास निधीतून करण्याचा प्रयत्न राहिल.

कार्यकारी अभियंता श्री.पवार म्हणाले, सोलापूर-पाटस-दौंड-सिध्दीटेक या 33 किलोमीटर रस्त्याचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे.  40 टक्के काम अपूर्ण आहे. यावर उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी केल्या.

सिध्दटेक ग्रामपंचायत सरपंच अमोल भोसले यांनी सिध्दटेक मंदिरामागे बस स्थानक उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली. विशेष कार्यकारी अधिकारी अर्चना पाटील यांनी या दूरद्शय प्रणाली बैठकीचे संचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या