माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला अकरा लाखांची देणगी


कान्हूर पठार :
   येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर माध्यमिक व उच्चमाध्यमीक शाळेमध्ये १९८३ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे सुरु असलेल्या सुसज्ज इमारतीच्या बांधकामासाठी एकत्र येत ११११११ (एक लाख अकरा हजार एकशे अकरा मात्र रूपये ) देणगी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे मुख्य सचिव दत्तात्रय ठुबे व माजी विभागिय अधिकारी एस.पी.ठुबे यांच्या उपस्थितीत विद्लयाचे पर्यवेक्षक चंद्रकांत शिंदे यांचेकडे सुपुर्त केली.या वेळी माजी विद्यार्थी वरिष्ट पोलिस निरीक्षक सुनिल शेटे,कान्हूर पठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक गोपाळ ठुबे, मंडलआधिकारी शंकर ठुबे, प्रा.अरुणा ठुबे.यज्ञकांत ढगे, नंदकुमार शिंदे, नंदकुमार ठुबे, विस्तार अधिकारी जयराम ठुबे, सदानंद सोनावळे, शरद खिलारी, लताबाई ठुबे आदी उपस्थित होते.                           


 गेल्या काही दिवसांपासून विद्यालयाच्या नुतन इमारतीचे काम सुरु आहे. १९८३ वर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टूगेदर घेऊन शाळेसाठी मदत देऊन शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा मनोदय व्यक्त केला होता.मात्र वेगवेगळ्या विभागात व वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीनिमित्त राहणा-या मित्रांसी संपर्क करुन थोड्याच दिवसात हा निधी गोळा करुन शाळेस देण्यात आला.आत्तापर्यंत विविध वर्षातिल माजी विद्यार्थी,ग्रामस्थ व पालकांनी मिळुन पंचविस लाखापर्यंत निधी शाळेस दिला असुन अद्याप काम चालु आहे.         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या