ट्रकमधला कोळसा झोपडीवर पडल्याने डोळ्यांसमोर तीन मुलींचा मृत्यू; ठाण्यातील घटनेने हळहळ



ढिगाऱ्यात अडकून तीन मुलींचा दुर्दैवी अंत

भिवंडी येथील टेंभीवली भागात कोळशाचा ट्रक रिकामी करत असताना झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्यात अडकून तीन मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे. ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकऑप्सर तुटल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर घरातील सर्व सदस्य कोळशाखाली गाडले गेले होते. घरातील इतर सदस्य वाचले, मात्र तीन मुलींना जीव गमवावा लागला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेंभीवली येथील एका झोपडीमध्ये बालारा वळवी हे पत्नी, मुलगा आणि तीन मुलींसोबत राहत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या झोपडीलगत कोळशाने भरलेला ट्रक रिकामी करताना ट्रकमधील कोळसा त्यांच्या झोपडीवर पडला. या घटनेत वळवी कुटुंबीय ढिगाऱ्यात अडकले. स्थानिकांनी त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

यानंतर जखमी अवस्थेत मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या