लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यावर मोठी जबाबदारी !मुंबईः काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यांवर अखेर पक्षाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत एक कार्यक्रम झाला. यावेळी त्यांना या राजकीय जबाबदारीचे पत्र देण्यात आले. सुरेखा पुणेकरांबरोबर एकूण 12 कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईत एक कार्यक्रम झाला. यावेळी सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. सुप्रिया सुळे यांनी त्या निवडीचे पत्रही यावेळी पुणेकर यांना दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या सांस्कृतिक सेलच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होणार आहेत. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या