शेतकऱ्यांवरील अन्यायाबाबत आंदोलनाची महावितरणकडुन दखल


रांजणगाव गणपती :

 शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेती पंपाचे विज बिल थकीत असल्याचे कारण देऊन विज कनेक्शन कट करण्याची सरसकट कारवाई महावितरण कडुन सुरू असुन याबाबत भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी आवाज उठवला असुन शेतकऱ्यांचे शेती पंपाचे विज कनेक्शन कट करु नये व शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर, विज पोल, हाय टेंशन पोल चे भाडे व इतर मुद्यांवर  भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी पुकारलेल्या सत्याग्रह आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर महावितरण चे कार्यकारी अभियंता केडगाव विभाग यांनी दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी शिरूर येथील कार्यालयात बैठक बोलावली आहे.

पाचंगे यांच्या आवाहनानुसार अनेक शेतकऱ्यांनी महावितरणकडे भाडे /नुकसान भरपाई मागणीचे अर्ज द्यायला सुरुवात केली आहे. दि २३ जानेवारी २०२२ पासुन पाचंगे यांनी सत्याग्रह आंदोलन पुकारले असुन तिन दिवस धरणे आंदोलन व त्यानंतर उपोषण आंदोलन त्यांनी पुकारले आहे.
पाचंगे यांचे अभ्यास पुर्ण आंदोलन करण्याची पद्धत व टोल सह अनेक यशस्वी आंदोलने केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर कार्यकारी अभियंता महावितरण केडगाव विभाग यांनी बोलावलेल्या बैठकीकडे शिरुर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या