ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

बारामती : कार आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात बारामतीतील तिघांचा मृत्यू झाला आहे. मोरगाव नजीक रात्री उशिरा झालेल्या या अपघातात दोन महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. सराफ व्यवसायिक श्रेनिक भंडारी यांच्या पत्नी अश्विनी भंडारी,मुलगा मिलिंद भंडारी व बहीण कविता शहा यांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने भंडारी आणि शहा या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये जखमी बिंदिया भंडारी याना पुढील उपचारासाठी रुबी हॉस्पिटल मधे ॲडमीट केले आहे. परिवाराकडुन मिळालेल्या माहीतीत सोन्याचा माल असलेली बॅग देखील गायब झाल्याचे समजले आहे. हे कुटुंब एका घरगुती कार्यक्रमास्तव पुण्याला गेले होते सदर चा कार्यक्रम मंगळवारी दुपारी झाल्यानंतर सराफ व्यवसायानिमित्त दुकानच्या कामासाठी बाहेर पडले बारामतीकडे परतताना अपघात झाला झाल्याचे समोर आले आहे.

*चौकट :-१
"मोरगाव-बारामती रोडला पिवळे व पांढरे साईटपट्टे नसल्याने वाहन चालकाला गाडी चालवताना अंदाज येत नाही. त्यामुळे या रोडला मोठ-मोठी अपघात होतात. आणि या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.  या रोडला लवकरात लवकर पिवळे व पांढरे साईट पट्टे मारण्यात यावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे"

*चौकट :-२
"ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेकटर तसेच पाठीमागे फ्लोरेसेंट लाल रंगाचा कपडा बांधणे आवश्यक आहे. वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. अपघात होऊ नये यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांत अधिक ऊस भरणे, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे,  वेगाने व निष्काळजीपणाने वाहन चालविणे या गोष्टी टाळाव्यात"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या