भाजीपाला विक्रेत्या महिलेंचा तहसीलदारांना घेराव

शिरुरकासार : आठवडी बाजार शहरातील नियोजीत जागेवर भरु न दिल्याने शहरा पासुन दोन किलोमीटर 4 ठिकानी बाजार भरण्यास परवानगी दिल्यामुळे शेतकरी महिलांची मोठी तारांबळ उडाल्यामुळे संत्तप्त शेतकरी महिलांनी दि 19 रोजी सकाळी 10 वा तहसील काऱ्यालयात जावुन तहसीलदार सचीन खाडे यांना घेराव घातला.


कोरोनाच्या पार्क्ष्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार एका जागी न भरवता वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्याचे आदेश तहसील दारांना दिले होते. एकाच ठिकाणी गर्दी होवु नये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या जागी आठवडी बाजार भरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बुधवार रोजी नियोजीत जागेवर भरणारा आठवडी बाजार भरवु दिला नाही.
 काही भाजीपाला विक्रत्या शेतकरी महिलांनी सावता नगर भागात भाजी विक्री साठी परवानगी मागीतली.
 परंतु प्रशासणाने त्या ठिकाणी परवानगी नाकारल्याने संत्तप्त शेतकरी महिलांनी तहसील कार्यालयात जावुन तहसीलदार सचीन खाडे यांना घेराव घातला. शेळी विक्री बाजार भरण्यास नियोजीत जागेवर परवानगी देता. मग आम्हालाही या ठिकानी भाजीपाला विक्री करु द्या अशी मागणी महिलांनी केली. परंतु कोरोनाच्या पार्क्ष्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरात ठरवुन दिलेल्या चार ठिकाणीच बाजार भरवावा लागेल असा सक्त आदेश सचीन खाडे यांनी दिले. त्यामुळे तहसीलदार, व शेतकरी महिलांमधे शाब्दीक चकमक पाहण्यास मिळाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या